Manoj Jarange | राज्यात मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे. यावेळी लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केला असल्याचा आरोप मराठा आंदोलक करत आहेत. या प्रकरणी आता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आले होते. यावेळी पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते, तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच त्यांची मेडिकल चाचणी करण्याचीही मागणी मराठा आंदोलकांनी केली होती.
यावर बोलताना मनोज जरांगे ( Manoj Jarange) म्हणाले, ‘मी कुणाला विरोधक मानत नाही आणि मानले तर सोडत नाही. काहीही होऊ दे, मला घेणे देणे नही. मी त्या विषयी बोलत पण नाही, एकमेकांना आडवे पाडायची सवय नाही. काही जणांना थुंका चाटायची सवय असते. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा मारामाऱ्या कोण लावते ? जाणून बुजून कोण भांडण लावते हे सर्वांना माहीत आहे. करता करविते छगन भुजबळ आहेत, दंगली आणि ओबीसी वाद निर्माण केला जात आहे, ज्यांना आरक्षणाचा धक्का लागत नाही ते लोक पण विरोध करतात,’ असं यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी | CM Eknath Shinde
‘महाराष्ट्र विधानसभा २०२४ विजय संकल्प संमेलना’चे मुंबईत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर | Uday Samant