भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण पक्षाला… ; एकनाथ खडसे यांचा दावा

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council elections) दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena, Bharatiya Janata Party, Congress and NCP) असे चारही पक्ष आपआपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीनं पार पडणार आहे.

दरम्यान, भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण पक्षाला सोडून मला मतदान करणार नाहीत, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलंय. यात विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. अश्यात आपल्या उमेदवारा जिंकवण्यासाठी सगळेच पक्ष जीवाची बाजी लावत आहेत. अश्यात भाजपचे अनेक आमदार खडसेंच्या संपर्कात असल्याचं त्यांनी याआधीही सांगितलं पण हे आमदार पक्ष निष्ठ आहेत. ते पक्षाला सोडून आपल्याला मतदान करणार नाहीत, असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे.