बीड | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबतीत मांडलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, आरक्षण (Maratha Reservation) मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात हे मांडण्याऐवजी त्यांनी असे म्हटले आहे की, मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. ते आरक्षण वाढवले की, मराठा समाजाला न्याय मिळेल. आम्ही याचा अर्थ असा काढतो की, ओबीसींचा विरोध आहे मराठ्यांना ओबीसीमध्ये घेण्यासाठी आणि उध्दव ठाकरे सुचवतात की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं. भांडणे मिटवण्याऐवजी भांडणे लावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शांतता भंग होण्याची शक्यता अधिक असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप