गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात  मराठा समाज आक्रमक; पुण्यात जोरदार घोषणाबाजी

पुणे –  .अॅड गुणरत्न सदावर्ते(Ad Gunratna Sadavate) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आज सदावर्तेंना या प्रकरणात हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या(Maratha Kranti Morcha) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी. त्यामुळे काहीकाळ ताणावाचे वातावरण तयार झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार,  आज ऍड.गुणरत्न सदावर्ते हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर झाले होते.मराठा क्रांती मोर्चाचे अमर पवार यांनी छत्रपती घराण्याची बदनामी केल्या प्रकरणी दीड वर्षांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्या संदर्भात भा. विद्यापीठ पो.स्टेशनने पाठवलेल्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी ते आले होते.या प्रसंगी पोलीस स्टेशन बाहेर, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी धक्काबुक्की करत ढकलत पोलीस स्टेशन पासून दूर करण्याचा प्रयत्न केला.सदावर्ते व त्यांची पत्नी जबाब देऊन गेल्यानंतर तुषार काकडे, अमर पवार, सचिन आडेकर, प्रसाद कोंडे, करण जगताप, गुरुनाथ चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले.यावेळी आंदोलन करीत असताना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.