जेष्ठ मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचे शनिवारी आजारपणाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. कोल्हापुरातील चित्रपट कार्यकर्ते अर्जुन नलावडे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वासोच्छवासाची तक्रार होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शनिवारी सकाळी पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.

व्यवसायाने शिक्षक असलेल्या भालचंद्र यांनी दिवंगत गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या ‘गावरान मेवा’ या नाटकातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘झुंजा तुझी माझी’, ‘जव्याची जात’ आणि इतर 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर तीन पुस्तकेही लिहिली होती.