नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी’च्या परिवारात नवरत्नांचा सहभाग

Planet Marathi

मुंबई : नवरात्र म्हणजे देवीचा, स्त्री शक्तीचा जागर, नवरात्र म्हणजे नवरंगांचा,सकारात्मकतेचा उत्सव. हा नवरात्रोत्सव अधिकच उत्साही बनवण्यासाठी ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये नवरत्नांचा सहभाग होत आहे. यापूर्वी ‘प्लॅनेट टॅलेंट’च्या परिवारात अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, गायत्री दातार, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, संजय जाधव, प्राजक्ता माळी, शिवानी बावकर, निखिल चव्हाण, सायली संजीव या तारेतारकांचा समावेश झाला आहे. आता यात आणखी नऊ रत्ने सहभागी होणार आहेत. या नऊ तारका कोण असतील, हे नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपल्याला कळणार आहे.

‘प्लॅनेट टॅलेंट’च्या परिवारात सहभागी झालेल्या या नवरत्नांबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”आमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की, या नऊ तारका आमच्या परिवारात सहभागी होत आहेत आणि यासाठी नवरात्रीपेक्षा दुसरा चांगला मुहूर्त असूच शकत नाही. या आधीही ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये अनेक नामवंत तारेतारका सहभागी झाले आहेत. त्याचा फायदा साहजिकच त्यांच्यासह आम्हा सर्वांनाच होत आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये सहभागी होणाऱ्या या तारकांनीही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि ‘प्लॅनेट मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर त्या यशाची एक आणखी पायरी चढतील, याची आम्हाला खात्री आहे. आता नव्याने सहभागी होणारे हे नऊ रंग कोणते असतील, हे लवकरच कळेल.’

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=49NUse5VrPE

Total
0
Shares
Previous Post
Drugs

एखाद्या सुपरस्टारच्या मुलाला ड्रगच्या प्रकरणात पोलिसांनी अटक करण्याची ही पहिली वेळ नाही

Next Post
Shri Suktam

यंदाचा नवरात्रोत्सव होणार अधिकच चैतन्यमय

Related Posts
hutatma vedprakash

मराठवाडा मुक्ती गाथा : गुंजोटी येथे वेदप्रकाश हुतात्मा झाले; मराठवाडा मुक्ती लढा तीव्र झाला

Latur –  स्टेट काँग्रेसने स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष तीव्र झाला , जुलूम व अन्याय यांचा प्रतिकार…
Read More
आदिवासी संस्कृती संपवण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा :- नाना पटोले

आदिवासी संस्कृती संपवण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा :- नाना पटोले

मुंबई- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यातील ५५ वर्ष केंद्रात काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना…
Read More
Dumpster diving | कचरा विकून हा माणूस 1 वर्षात करोडपती झाला, आता श्रीमंतांसारखं आयुष्य जगतोय!

Dumpster diving | कचरा विकून हा माणूस 1 वर्षात करोडपती झाला, आता श्रीमंतांसारखं आयुष्य जगतोय!

Dumpster diving | कचऱ्याचे ढीग (selling garbage) जे पाहून तुम्ही पाठ फिरवता, पण हा कचरा एखाद्या खजिन्यापेक्षा कमी…
Read More