मोठी बातमी! अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीला राम राम करत भाजपात प्रवेश

नाशिक- अनेक अभिनेते आणि अभिनेत्री राजकारणात सक्रिय आहेत. त्यांपैकीच एक असलेल्या जेष्ठ मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भाजपात (Priya Berde Joins BJP) प्रवेश केला. यापूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भाग होत्या.

जुलै 2020 मध्ये प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. कोरोनाच्या जागतिक महामारीत प्रियंका बेर्डे यांनी अनेक गरजवंतांना मदत केली होती. मात्र 2 वर्षातच प्रिया यांनी राष्ट्रवादीला रामराम केला असून आज नाशिकमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यामागील अद्याप त्यांनी कारण स्पष्ट केलेले नाही.