ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती, वाचा कोण कोण आलं?

ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती, वाचा कोण कोण आलं?

संपूर्ण महाराष्ट्रासह दिल्लीतही ज्याची उत्सुकता आहे, असा बहुचर्चित ठाकरे बंधूंचा ( Thackeray brothers) ऐतिहासिक मेळावा आज मुंबईत होणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर येणार आहेत. वरळीतील एनएससीआय डोममध्ये हा मेळावा पार पडणार असून, दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यावेळी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मराठी भाषा आणि अस्मितेसाठी राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी साहित्यिक, कलाकार, शिक्षक आणि विविध मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. “कोण येतंय आणि कोण नाही, ते मी बघतोच,” असं ठाम वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं होतं.

या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात ( Thackeray brothers) मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे. तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव आणि चिन्मयी सुमीत यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले आहेत. डोममध्ये मोठ्या संख्येने मराठीप्रेमींची गर्दी झाल्याने वातावरण अतिशय जल्लोषमय झाले आहे. आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे दृश्य मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“एकनाथ शिंदे आता मुजरा पण करतील”, संजय राऊतांचा खोचक टोला

“शरद पवारांनीही जय कर्नाटक म्हटले होते याचा अर्थ…”, फडणवीस यांच्याकडून शिंदेंचा बचाव

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा

Previous Post
"एकनाथ शिंदे आता मुजरा पण करतील", संजय राऊतांचा खोचक टोला

“एकनाथ शिंदे आता मुजरा पण करतील”, संजय राऊतांचा खोचक टोला

Next Post
"हा महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण", ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यावर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया

“हा महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण”, ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यावर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया

Related Posts
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला आयसीसीने दिली शिक्षा, नेमकं काय घडलं?

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला आयसीसीने दिली शिक्षा, नेमकं काय घडलं?

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सर्वात मोठा सामना, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan), २३ फेब्रुवारी रोजी दुबई येथे…
Read More

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर्गीय सुरांचे स्वर्णिम पर्व संपले – नाना पटोले

मुंबई – आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणा-या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न…
Read More
Shirur LokSabha | "यापूर्वी नटरंगला निवडून दिले, पण यंदा...", आशाताई बुचकेंचे मतदारांना शिवाजीदादांना निवडून देण्याचे आवाहन

Shirur LokSabha | “यापूर्वी नटरंगला निवडून दिले, पण यंदा…”, आशाताई बुचकेंचे मतदारांना शिवाजीदादांना निवडून देण्याचे आवाहन

Shirur LokSabha | देशामध्ये मोदी जी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दादा आपल्याला आपल्यासमोर आहे. मागच्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही…
Read More