मराठी पत्रकारांना खरोखरच लाज, शरम, स्वाभिमान, इभ्रत काही काही म्हणून उरलेलं नाही – वैद्य 

पुणे – खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या वक्तव्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना उत्तर देण्याऐवजी केलेला थुंकण्याचा केलेला विकृत प्रकार वादात सापडला आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठवली जात असून महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक मोठ्या नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा प्रकार केल्याने राऊतांच्या कृतीवर टीका होते आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी माध्यमांवरच टीकास्त्र सोडले आहे. त्या म्हणाल्या, मराठी पत्रकारांना खरोखरच लाज, शरम, स्वाभिमान, इभ्रत काही काही म्हणून उरलेलं नाही. गेल्या एका आठवड्यात संजय राऊत नावाचा गलिच्छ माणूस माईकमध्ये थुंकला, एकदा नाही दोनदा. एका तरी जगाला ज्ञान देणाऱ्या मराठी संपादकाने उघड निषेध केलाय का त्याचा? माईकचे बोंडुक त्याच्या तोंडासमोर धरून त्याची बाईट घ्यायला जाणाऱ्या लाचार, पोटार्थी वार्ताहराची तर बात सोडूनच द्या, पण कुठे गेले कुबेर, करंदीकर, खांडेकर, जोशी?

कणाहीन गांडुळेच उरली आहेत का आता मराठी पत्रकारितेत? मग कशाला गोष्टी करता टिळक-आगरकरांच्या वारश्याची? लोळण घ्यायची तीही संजय राऊत सारख्या नॉटी इसमाच्या पायाशी? शी! असं म्हणत शेफाली वैद्य यांनी मराठी माध्यमांना लक्ष्य केले आहे.