काय सांगता नवीन वर्षात या गोष्टी महागल्या

आज पासून नवीन वर्षांची सुरुवात झाली आहे. हे नवीन वर्ष खूप सारा आनंद आणि खूप साऱ्या नवीन संधी जरी घेऊन येणार असलं तरी या नवीन वर्षात अनेक नवीन आव्हाने देखील असणार आहे. आले आले नवीन वर्ष खूप सारे महागाई घेऊन असे म्हणावे लागेल. सर्वात आधी आपण दिलासा देणारा बातमी काय आहे हे जाणून घेणार आहोत. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर स्वस्त झाले आहेत. आता काय महागणार आहे ते जाणून घेऊया.

एटीएम मधून पैसे काढणे महागणार – 1 जानेवारी पासून एटीएममधून पैसे काढणे अवघड होणार आहे. म्हणजेच काय सुरुवातीचे तीन ट्राझक्शनवर मोफत असणार आहेत, त्या नंतरच्या ट्राझक्शनवर 20 ऐवजी 21 रूपये मोजावे लागणार आहे. याबाबतचे नियम प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असतील.काही बँका 8 तर काही बँका 21 रूपये आकारातील.
ओला, उबर महागणार

1 जानेवारीपासून झोमॅटो, स्विगी अशा ई-कॉम स्टार्टअप कंपन्या त्यांच्या सेवांवर जीएसटी आकरतील.त्यांना त्यांचे चलन सरकारकडे जमा करावे लागणार आहे.त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भार पडणार आहे.त्यामुळे ओला, उबर यांची सेवा महागणार आहे.मात्र ऑटोरिक्षा चालक ऑफलाइन सेवा देत असल्याने त्यांना जीएस्टी लागू होणार नाही.

 

पोस्ट बँकेत 25 रूपये शुल्क – एटीएम प्रमाणे आता पोस्ट बँकेत ग्राहकांना एक मर्यादापासून पुढे पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी आता शुल्क आकारले जाणार आहे. चार वेळा पैसे काढल्यानंतर आता त्यापुढे प्रत्येक ट्राझक्शनवर किमान 25 रूपये शुल्क लागणार आहे.

 

बुटावर 5 ऐवजी 12 टक्के जीएसटी – एक जानेवारी पासून बुटावर पाच ऐवजी बारा टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.हा निर्णय फक्त बुटांसाठी आहे. चप्पलाबाबत हा निर्णय घेण्यात आला नाही.