Marathi serial | ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा 

Marathi serial | 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा 

Marathi serial | सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा ‘ड्रीम बॉय’ बनलाय. पण या ‘ड्रीम बॉय’ची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात मयूरी हे दोघं आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. राजवीर आणि मयूरी यांच्यामध्ये आता प्रेमाची कबुली झाली आहे. प्रेमाच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. मालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे पण याबद्दल बाकी कोणालाही काही समजलेलं नाही. यामिनी या लग्नाच्या विरोधात आहे.  राजवीर आणि मयूरी यांचं लग्न होऊ नये यासाठी तिने भरपूर प्रयत्न केले, पण आता राजवीर आणि मयूरी यांचे लग्न आता ठरलं आहे आणि आता यामिनीच्या हातातून परिस्थिती बाहेर गेली आहे. आजवर तिने राजवीरला मयूरीपासून लांब ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. पण आता मयूरी आणि राजवीर एकत्र येणार आहेत आणि त्यांचं लग्न थाटामाटात होणार आहे. सराफ कुटुंबातलं हे लग्न नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे.

या लग्नात मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळा असे सगळे कार्यक्रम पार  पडणार आहेत. या सोहळ्यात काही विशेष व्यक्तिरेखा सहभागी होणार आहेत.’तू भेटशी नव्याने’ मालिकेतील शिवानी सोनार ही अभिनेत्री धमाल असे नृत्य करणार आहे. याव्यतिरिक्त मयूरी आणि राजवीर, मयूरी आणि संपूर्ण सराफ कुटुंब एकत्र  नृत्य करणार आहेत. रविवार रात्री ८ वाजता महाएपिसोड मध्ये लग्नं प्रेक्षकांना पाहायला (Marathi serial) मिळणार असून त्या आधीच्या सगळ्या भागात संगीत, हळद असे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत.

आता हे लग्न व्यवस्थित पार पडेल का काही अडथळा येईल  हा मोठा प्रश्न असणार आहे. यामिनी काही शांत बसणार नाही. हे लग्न होऊ नये यासाठी ती काही-ना काही हालचाल नक्की करणार. यामिनीने चक्क मयूरीचे अपहरण करण्याचा बेत आखला आहे. मयूरी यातून  स्वतःला कशी वाचवणार? शिवाय मयूरीला या लग्नात बॉडीगार्ड म्हणूनही वावरायचे आहे. ती हे सगळं कसं निभावून नेणार, हे पाहणं‌ उत्सुकतेचं ठरणार आहे.

राजवीरला या सगळ्याची काही माहिती नाही. जर त्याला समजलं तर गोष्टी आणखी कठीण होऊन बसतील. लग्नानंतर राजवीर आणि मयूरी कशा प्रकारे आपला संसार करतील, हे  पाहणंही प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल. ‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’ या मालिकेत हे सर्व  प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, पण आता आत्याच्या येण्याने राजवीर मयूरीच्या या प्रेमकहाणीत अजून काय ट्विस्ट येणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. कारण आता लग्नसोहळा पार पडणार असून प्रेक्षक या लग्नासाठी फार उत्सुक आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
MahaVitaran Pune | अतिवृष्टीमुळे अधिक सतर्क राहा, वीजसुरक्षेची खबरदारी घ्या; महावितरणचे आवाहन

MahaVitaran Pune | अतिवृष्टीमुळे अधिक सतर्क राहा, वीजसुरक्षेची खबरदारी घ्या; महावितरणचे आवाहन

Next Post
Nana Patole | भाजपाची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ईडी, सीबीआयकडून कारवाई

Nana Patole | भाजपाची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ईडी, सीबीआयकडून कारवाई

Related Posts
mahesh tapase

मविआच्या नेत्यांना थेट दोषी ठरवण्याचे काम भाजपकडून केले जात आहे – महेश तपासे

मुंबई  – भाजपच्या काही नेत्यांना आजकाल दैवी साक्षात्कार होऊ लागलाय का? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य…
Read More
टिपू सुलतानचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही - धीरज घाटे

टिपू सुलतानचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही – धीरज घाटे

Tipu Sultan: ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली ज्याने अनेक लोकांचे बळजबरी धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला अशा…
Read More
Vijay Shivtare : "चौथीत असताना मी बिड्या प्यायचो", विजय शिवतारेंचा खळबळजनक खुलासा

Vijay Shivtare : “चौथीत असताना मी बिड्या प्यायचो”, विजय शिवतारेंचा खळबळजनक खुलासा

Vijay Shivtare : लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांवर घणाघाती टीका करत विजय शिवतारे (Vijay Shivtare) चर्चेत आले होते. त्यांनी…
Read More