‘ऐका दाजिबा’ म्हणत सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अतिशय लोकप्रिय गायिका वैशाली सामंत ( Vaishali Samant) सध्या सर्वत्र चर्चेत आहे ते म्हणजे नुकताच रिलीझ झालेला छावा चित्रपटातील गाणं ‘आया रे तूफान’ साठी. वैशालीने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत पण यावेळी त्यांनी अक्षरशः सूरांची जादू दाखवत छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाईंवर म्हणजेच विकी कौशल आणि रश्मिका मंदाना वर चित्रित ह्या गाण्यानी सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. गाण्याबद्दलची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, ए. आर. रहमान सोबत गायिका वैशाली सामंत हिला डूएट गाण्याची सुवर्ण संधी मिळाली. रहमान यांचा आवाज जादुई आहेच, पण वैशालीचा आवाज अंगावर रोमांच उभे करतो.
छावा या चित्रपटाची गाणी खूपच गाजत आहे. ‘आया रे तूफान’ रिलीझ होताच काही तासांमध्ये युट्युबवर या गाण्याने लाखो व्युज मिळवले. प्रत्यक्षात हे गीत पाहताना ऊर अभिमानानं भरून येतो. मराठमोळी गायिका वैशाली सामंतने नक्कीच आपल्या सुरेल आवाजाने गाण्याची शोभा वाढवली आहे.
ऑस्कर विनिंग संगितकार ए. आर. रेहमान सोबत गाण्याची संधी मिळाली म्हणून वैशाली सामंत ह्यांनी आभार व्यक्त करताना आपलं मत मांडलंय ते म्हणाले “छावा चित्रपटाचं हे गाणं माझ्या वाटेला आलं हेच माझ्या सांगितीक वाटचालीतील खूप महत्वाचं गाणं आहे. ए.आर.रहमान सरांसोबत रेकॉर्ड करताना मला खूप काही शिकायला मिळालं, माझ्यातल्या गायिकेवर विश्वास दाखवला हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. गाण्याला भरपूर प्रेम मिळतंय. ऑडिओ लाँचच्या दरम्यान मला प्रत्यक्ष ए.आर.रहमान सरांसोबत गाता आलं हि खूप मोठी संधी होती त्यामुळे मी ए.आर.रहमान सरांचे आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सरांचे मनःपूर्वक आभार मानते. ”
ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं इर्शाद कामिल आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलं आहे तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना या दोघांवर हे गाणं चित्रित केलं गेलंय.या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.
भगवे कि शान में चमका आसमान, आया आया आया रे तुफान ! खरंच या गाण्याला प्रेक्षकांकढुन भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि वैशाली सामंत ह्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे आजवर गायलेल्या गाण्यांपैकी वैशाली सामंत ( Vaishali Samant) ह्यांचं “आया रे तूफान” हे गाणं इंडस्ट्री साठी आणखी एक अनमोल देणगी ठरली आहे हे नक्की.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शिवस्मारक केवळ घोषणांपुरते! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान थांबवा! शरद पवार पक्षाची निदर्शने
तुमच्याकडे परिवारवाद तर आमचा महाराष्ट्रवाद!, शिंदे यांचा रत्नागिरीतून उबाठावर हल्लाबोल
मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा! लांडगे यांची मागणी