मराठवाड्यातील मंत्री केवळ पैसा कमविण्यात व्यस्त आहेत – फडणवीस

जालना – औरंगाबादमधील मोर्चानंतर आज भाजपने जालन्यात देखील पाणी प्रश्नावरून मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या (Leader of Opposition Devendra Fadnavis and Union Minister Raosaheb Danve) नेतृत्वात जालन्यात भाजपचा जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला पाणी प्रश्नावरून चांगलेच घेरले. शहरातील मामा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे (BJP District President MLA Santosh Danve, MLA Narayan Kuche) आदींची मोर्चाला उपस्थिती होती.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री केवळ कार चालवताय तर सरकारतर भगवानच चालवत आहे. मविआ सरकारमुळे अनेक कामे रखडली आहे. पाणीप्रश्नासाठी ठाकरे सरकार गंभीर नाहीच, असे म्हणताना आमच्या सरकारने 129 कोटी रुपये पाणी योजनेसाठी पैसै दिले. मात्र अडीच वर्षांत योजना काय पुढे गेली नाही. हे सरकार केवळ चालू कामे बंद करण्याचे काम करते आहे.

हे सरकार सरकार सगळ्या योजना बंद करतंय, वैधानिक विकास महामंडळ बंद केले, आणि मराठवाड्यावर अन्याय केला. मात्र मंत्र्यांनी ब्र शब्द काढला नाही, मात्र मराठवाड्यातील मंत्री केवळ पैसा कमविण्यात व्यस्त आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जनतेच्या प्रश्नाचे ठाकरे सरकारला काही देणं घेणं नाही. त्यांना गरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंहासन दिले आहे. मात्र त्यांच्याकडून जनतेसाठी काही काम झाले नाही.

अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारने राज्याला किाय दिले सांगावे, असा प्रश्न केंद्रीय रावसाहेब दानवे यांनी आजच्या जलआक्रोश मोर्चात उपस्थित केला आहे. राज्य सरकारने जालण्यातील मोर्चाची दखल घ्यायला हवी असे सांगताना, येणारा काळ नक्कीच परिवर्तनाचा असेल असे रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे.