नामांतराच्या निर्णयाविरोधात छ. संभाजीनगरामध्ये राष्ट्रवादीत सामूहिक राजीनामे

छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्र शासनाने शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt)loks औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhajinagar) असं केले असून यामुळे सामान्य शिवप्रेमी जनता या निर्णयाचे स्वागत करत आहे. मात्र दुसरीकडे या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी उपोषण सुरु केले आहे. यातच आता राष्ट्रवादी (NCP) पक्षात सामूहिक राजीनामे देण्यात येत आहे.

बुधवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील 50 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत सामूहिक राजीनामे दिले आहेत. नामांतराच्या बाबत पक्षाने घेतलेली भूमिका पटत नसल्याने आणि पक्षाची विचारसरणी बदलल्याचा आरोप करत हे राजीनामे देण्यात आले आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या 50 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.