एसटी कर्मचाऱ्यांच्या  रोषाची दखल मविआ सरकारनं आता तरी घ्यावी – पाटील

मुंबई – एसटी कर्मचारी आज पुन्हा एकदा आक्रमक झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी आज धडक दिली .आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या आहेत.

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहे. सत्ताधारी नेते हे भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न करत  आहेत तर विरोधक देखील जशास तसे उत्तर देत आहेत.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन कुटुंबीय वेठीस धरले जातील असं आंदोलन करणं आपली परंपरा नाही. त्यामुळे शरद पवारजी यांच्या घरी जाऊन आंदोलकांनी रोष व्यक्त करणं चुकीचंच. मात्र, त्यांच्या रोषाची दखल मविआ सरकारनं आता तरी घ्यावी, अशी अपेक्षाही या निमित्तानं व्यक्त करतो. असं ते म्हणाले.

https://twitter.com/ChDadaPatil/status/1512427467835080704?s=20&t=6J4hOpXMH6G7W3CXCSSB9w