किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा; मीनाक्षी शिंदे कडाडल्या

ठाणे – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाणे जिल्हा संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde )यांची मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर शिंदे यांनी सेनेवर तोफ डागली आहे.

आम्ही आमच्या शिंदे साहेबांमुळे आहोत आणि पुढेही राहू. शिवसेनेतून आमची कोणी हकालपट्टी करु शकत नाही, आम्ही शिवसैनिकच आहोत, आमचं पद अशा प्रकारे कोणी काढून घेऊ शकत नाही आणि बातम्यांमधून दाखवलेलं लेटर अजून तरी आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, असं मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.

आम्ही रस्त्यावर उतरलोच नसतो,हकालपट्टी हा शब्द हास्यास्पद आहे, तुम्ही अशाप्रकारे सर्वांचीच हकालपट्टी करणार असाल, तर शिवसेना शाखेला टाळं लावायला तरी कोणाला ठेवणार आहात का? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.