मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांची बैठक; जाणून घ्या नेमकी काय झाली चर्चा

Shivsena : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे. (The Central Election Commission has decided to give the name Shiv Sena and the symbol Dhanushyaban to the Shinde group) . हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटाचा आनंद आता गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान,निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सोमवारी सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. आज मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तसंच मशाल चिन्ह हे शिवसेनेला साजेसं होतं, मात्र ते चिन्ह गेल्यास शिवसेनेला शोभेल असं चिन्ह कुठलं निवडता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जात आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत थेट निवडणूक आयोगावरच तोफ डागली आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच, हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=7L4u29IFft8

You May Also Like