Chhatrapati Sambhaji Raje | शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज बैठक, छत्रपती संभाजी राजेंची प्रमुख उपस्थिती

Chhatrapati Sambhaji Raje | अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन (६ जून) च्या निमित्त पूर्व नियोजनासाठी आज रविवारी (ता. १९) राज्यव्यापी बैठक होत आहे. पुणे येथील शिवाजीनगरमधील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे सायंकाळी सव्वा पाच वाजता बैठकीस सुरुवात होईल.

समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज (Chhatrapati Sambhaji Raje), युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे.

यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत असून, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सोहळा दिमाखात साजरा केला जाणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश-परदेशातून शिवभक्त सोहळ्यास हजेरी लावणार आहेत. तसेच शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी, लेझीम, ढोल ताशा, धनगरी ढोल, पालखी सोहळा आकर्षण असणार आहेत. एकूणच या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शिवभक्तांच्या सूचना मागविण्यात येत आहेत. तरी या बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप