राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार; राज ठाकरे यांची घोषणा

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा आज पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

यावेळी बोलताना त्यांनी एक मोठी घोषणा देखील केली. संभाजीनगर ( Sambhajinagar ) हा महाराष्ट्राचा मध्य आहे. यापुढील माझ्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रासमोर आज अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळेच राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, या सभेसाठी मनसेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत दाखल झाले होते. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या ( Maharashtra Sanskritik Mandal ) मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray )  यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. त्याच मैदानावर राज ठाकरे यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग सभा झाली. या सभेला तुफान गर्दी झाल्याचं दिसून आलं.