‘मायकल लोबो यांनी मतदारसंघात वेश्या व्यवसाय आणि ड्रग्सचा धंदा कसा वाढेल तेच पाहिले’

मडगाव : गोव्यात सध्या विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरु आहे. या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता भाजपकडून माजी मंत्री मायकल लोबो यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. गोव्यात येणारे सरकार हे भाजपचेच (BJP) असणार याची खात्री लोबो याना पटली आहे. जर भाजप सत्तेवर आले तर आपल्याविरुद्ध कारवाई अटळ हे आता त्यांना समजून चुकले आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते उर्फ़ान मुल्ला यांनी केला आहे.

उर्फ़ान मुल्ला पुढे म्हणाले, दुसऱ्या पक्षावर आरोप करण्याऐवजी आपण मंत्री असताना स्वतः काय केले ते लोकांना सांगावे असे आव्हान त्यांनी दिले. जर अशी कुणी व्यक्ती गोव्यात भाजप संघटना सुदृढ करण्यास वावरत असल्यास आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल असे म्हटले. गोमंतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मुल्ला म्हणाले, लोबो यांनी आपल्या मतदारसंघाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. उलट या मतदारसंघात वेश्या व्यवसाय आणि ड्रग्सचा धंदा कसा वाढेल तेच पाहिले. या लोबोवर त्यावेळी काँग्रेस (Congress) प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ही टीका केली होती. दुर्दैवाने तेच आता त्यांच्या पक्षाचे उमेदवार बनले आहेत असे ते म्हणाले.