सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात मिनी रेस्क्यू QRV वाहनाचा (Mini Rescue QRV Vehicle) समावेश करण्यात आला आहे. या नवीन वाहनामुळे अग्निशमन दल आणखी सक्षम होणार असून, आपत्ती काळात अधिक प्रभावी सेवा देता येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.
नवीन वाहनाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्र शासनाने सांगली मनपाला हे वाहन उपलब्ध (Mini Rescue QRV Vehicle) करून दिले आहे. या वाहनामध्ये विविध आपत्कालीन उपकरणे असून, त्याचा उपयोग छोट्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी होणार आहे.सदर वाहनात रेस्क्यू इक्विपमेंट, लहान पाण्याची टाकी, कटर आणि स्पेडर, जॅक आणि इमर्जन्सी लाइटिंग सिस्टीम या सुविधा आहेत:
महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी नवीन वाहनाची पाहणी करून पूजन केले आणि ते अग्निशमन दलाच्या सेवेत रुजू करण्याचा आदेश दिला. यावेळी उपायुक्त विजया यादव, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. हे वाहन शहरातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद मदत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी दिली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
आमदार सुरेश धस अडचणीत; राजीनाम्यासह नार्को टेस्टची मागणी
उन्हाळी सुट्टीत एसटीचा थंडगार प्रवास, राज्यभर 872 शिवशाही बसेस धावणार
पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार; पुणे महापालिकेचा इशारा