‘मंत्र्याच्या ड्रायव्हरला ४० हजार पगार अन् एसटी कर्मचाऱ्याला फक्त १२ हजार हे चुकीचं’

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी घोषणा करतानाच एसटी कर्मचाऱ्यांना संप (ST Workers Strike) मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, राज्यातील जवळपास 90 हजारपैकी 73 हजार एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून एस.टी (ST Strike) कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानातील आंदोलनातुम भाजपनेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली असली तरी भाजपचा एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठींबा आहे. अशात आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने लढायला महाविकास आघाडी सरकारमधीलच एक मंत्री समोर आला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार अत्यंत कमी असल्याचे कबुल करत वेळ येईल तेव्हा त्यांच्यासाठी आंदोलन करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. मंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार पगार मिळतो. पण जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो, त्याला फक्त 12 हजार पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असं बच्चू कडू म्हणाले आहे.

हे देखील पहा