मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना (Corona) व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या व्हेरिएंट करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा असून तो अधिक घातकही आहे. नुकतंच B.1.1.529 या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने ओमीक्रोन (Omicron Variant) असं नाव दिलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील या विषाणू बद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र अस असलं तरी देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
यावर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जगभरात कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. अशावेळी राज्य सरकारनेही कोरोना नियम पाळण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच निर्बंध लादण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यावर बोलताना कोरोनाची भीती एवढी झाली की सो जा बेटे गब्बर आयेगा असं म्हणण्याऐवजी आता सो जा बेटे कोरोना आ जायेगा, असं म्हणण्याची वेळ आल्याची मिश्किल टिप्पणीही बच्चू कडू यांनी केलीय. त्यामुळे सरकारला कठोर निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.
हे देखील पहा