अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावले मंत्री छगन भुजबळ…

नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे आज सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी गेले होते. दरम्यान दर्शन करून परतत असतांना वणी दिंडोरी रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झालेला होता. यामुळे प्रचंड वाहतुकीची देखील कोंडी झालेली होती.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांचा ताफा जात असतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपली वाहने थांबवून अपघात ग्रस्त वाहनाच्या ठिकाणी पाहणी करत अपघात ग्रस्तांची चौकशी केली. तसेच याठिकाणी मदतकार्य करत असलेल्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत विचारपूस केली. तसेच याठिकाणी थांबून सर्व वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मंदिरे सुरू करण्यात आलेली असून राज्यावर, देशावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर होउदे अशी सप्तश्रृंगी मातेच्या चरणी प्रार्थना आपण केली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=Z4Y6-snAmEc&t=26s

Previous Post
ajit pawar - jayant patil

महाराष्ट्र बंदच्या घोषणेमुळे सहन न झाल्याने भाजपकडून अजितदादांवर कारवाई – जयंत पाटील

Next Post
Bira 91

जाणून घ्या इतक्या कमी वेळात ‘बिरा 91’ बिअर इतकी लोकप्रिय कशी झाली?

Related Posts
एकेकाळी ३५ रुपयांची नोकरी करणाऱ्या रोहित शेट्टीने आज उभारलंय मोठं साम्राज्य, संपत्ती तर इतकी की...

एकेकाळी ३५ रुपयांची नोकरी करणाऱ्या रोहित शेट्टीने आज उभारलंय मोठं साम्राज्य, संपत्ती तर इतकी की…

नवी दिल्ली| रोहित शेट्टी (Rohit Shetty) आज बॉलिवूडचा अॅक्शन डायरेक्टर म्हणून ओळखला जातो. ‘सूर्यवंशी’, ‘सिंघम’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि…
Read More
raj thackeray

पुरोहित वर्गाच्या आशीर्वादासह पुण्यातून राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना

पुणे –  औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी(उद्या) होणाऱ्या बहुचर्चित सभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Maharashtra Navnirman…
Read More
Atul Benke | जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे, आमदार बेनकेंचा कोल्हेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Atul Benke | जो माणूस निवडून देतो त्याला आपल्याबद्दल तळमळ असली पाहिजे, आमदार बेनकेंचा कोल्हेंवर अप्रत्यक्ष निशाणा

Atul Benke | शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढलराव पाटील यांनी जुन्नर गावभेट दौऱ्या दरम्यान पिंपळगाव सिद्धनाथला भेट…
Read More