पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; मंत्री धनंजय मुंडेंचा साताऱ्यात दावा

सातारा – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीतील नेते विविध दावे करत आहेत. यातच आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील (Tuljabhavani Devi) तुळजाभवानी देवीदर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं.

यानंतर शिवसेनेकडून देखील राष्ट्रवादीला अनेक टोमणे मारण्यात आल्याचं दिसून आलं. यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करणे सुरु झाले आहे. येणाऱ्या काळाता राज्यात मुख्यमंत्री (CM) हा आपलाच असेल असं वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत व्यक्त केलं आहे.

कितीही मजबूत सरकार असलं तरी विरोधी पक्षनेता असताना त्या सरकारला गदागदा हालवण्याचं काम मी केलं. आज शब्द देतो येणाऱ्या काळात जर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपद कोणाला द्यायचा उद्या जर प्रस्ताव आला मुख्यमंत्री कोणीही असतील, आपलेच असतील, मात्र, ते पद आपल्याशिवाय कोणाला देणार नाहीत येवढी प्रतिष्ठा या मंत्रीपदाच्या कामांमुळे कमावली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.