Murlidhar Mohol | पुण्यातील भाजप कार्यकर्ते देवेंद्र जोग यांच्यावर गजानन मारणे टोळीतील गुंडांनी हल्ला केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आणि आरोपींवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या.
मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे तीन दिवस गुजरात आणि दिल्ली दौऱ्यावर होते. पुण्यात परतताच त्यांनी थेट देवेंद्र जोग यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जोग यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत त्यांनी त्यांना आणि त्यांच्या आई-वडिलांना धीर दिला. हल्ल्यात देवेंद्र जोग गंभीर जखमी झाले असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात मोहोळ यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कर्तबगार आणि शांत स्वभावाच्या तरुणावर असा हल्ला होतो, हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही. आज देवेंद्रवर हा हल्ला झाला, उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत असे होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी कठोर पावले उचलावीत,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल
‘हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा’, बॉलीवूड गायकाचं थेट योगींना आव्हान
गजा मारणेच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण; मुरलीधर मोहोळ यांचा संताप