मूल होत नसल्याने मिर्ची बाबाला शरण गेलेल्या महिलेसोबत बाबाने केले दुष्कृत्य

भोपाळ – भोपाळमधील (Bhopal) मिर्ची बाबा उर्फ ​​महंत वैराग्यानंद गिरी यांना बलात्काराचे आरोप झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे. भोपाळमधील एका महिलेने या कथित साधूवर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. मूल होत नसल्याच्या त्रासाबाबत महिलेने जानेवारी महिन्यात वैराग्यानंद गिरी यांची भेट घेतली होती. ​​यावेळी मिर्ची बाबा यांनी त्यांना आपल्याजवळ बोलावून प्रसादातून गुंगीचे औषध दिले. महिलेचा आरोप आहे की, तिने ते खाल्ल्याबरोबर ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर बाबाने तिच्यावर बलात्कार केला.

महिला शुद्धीवर आल्यावर तिला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तिने याप्रकरणी महिला गुन्हे (Crime) शाखेकडे धाव घेतली. बाबाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार पीडित महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आणि आपली आपबिती सांगितली. महिलेने सांगितले की, ​​मिर्ची बाबा यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने बदनामीच्या भीतीने तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला नाही.मात्र आता हिंमत दाखवत महिलेने आरोपी बाबाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ बाबाविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवून कारवाई सुरू केली. महिलेच्या तक्रारीवरून बाबाला ग्वाल्हेरमधून अटक करण्यात आली आहे.महिला गुन्हे शाखेच्या एसीपी निधी सक्सेना यांनी सांगितले की, पीडित महिलेने बाबाविरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. त्यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपी बाबाला तत्काळ अटक केली. त्याचवेळी या प्रकरणातील आरोपी बाबा म्हणतो की, आपल्याला खोट्या प्रकरणात गोवले जात आहे.