Big Breaking : सर्वात मोठी बातमी, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा

Bacchu Kadu News : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

नाशिक महापालिका आयुक्तांवर (Nashik Municipal Commissioner) आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years)याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती.

मिळालेल्या माहितीनुसार,  नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. महापालिका आयुक्त यांना धमाकवने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदर बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.