शिंदे गटातील बंडखोर आमदार भरत गोगावले यांच्या कारला अपघात; एकामागोमाग आठ गाड्यांची धडक

Mumbai – शिंदे गटातील बंडखोर शिवसेना (Shiv Sena MLA)आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या कारचा अपघात (Car Accident)झाला आहे. भरत गोगावले यांचा ताफा ईस्टर्न-एक्स्प्रेसवेवरुन निघालेला असताना आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. रस्त्यात टॅक्सी बिघडल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे.

ताफ्यातील गाड्या मात्र एकमेकांवर आदळल्या. अपघातात गाड्यांचं नुकसान झालं आहे. भरत गोगावले यांच्या एम एच 06 बी व्ही 5457 या फॉर्च्युनर गाडीचं बोनेट या अपघातात चक्काचूर झाला. तर गाडीला मागून दुसऱ्या वाहनानंदेखील धडक दिली. मुंबईत मंत्रालयाच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी  गाड्या एकमेकांना धडकल्या आणि ही दुर्घटना घडली.