Mahesh Landge | आमदार महेश लांडगे यांचा दणका चोविसावाडी येथील शाळा भूखंडाचे खासगीकरण अखेर रद्द!

Mahesh Landge | आमदार महेश लांडगे यांचा दणका चोविसावाडी येथील शाळा भूखंडाचे खासगीकरण अखेर रद्द!

Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे. चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक २/९२ शाळेसाठी आरक्षीत असलेला भूखंडाचे खासगीकरण करण्याचा निर्णय अखेर महापालिका प्रशासनाने मागे घेतला. संबंधित जागा खासगी संस्थेला देण्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. भाजपा आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी या खासगीकरण प्रक्रियेला तीव्र विरोध केला होता.

चऱ्होलीतील संबंधित शाळा आरक्षणावर खासगी संस्थेद्वारे शैक्षणिक इमारत उभारण्याबाबत महापलिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होती. तसेच, निविदा प्रक्रियाही सुरू केली होती. यावर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, मौजे चऱ्होली आरक्षण क्रमांक २/ ९२ मधील शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये प्रशासनाने क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) विकसित करावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली होती.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये नव्याने गावे सामाविष्ट झाली. त्यामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी या गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा विकसित करण्यासाठी २०१७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. आता आरक्षण असताना, त्या ठिकाणी खासगी संस्थांद्वारे शैक्षणिक संकूल उभारण्यापेक्षा महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्पोर्ट्स स्कूल सुरू केल्यास सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.

दरम्यान, खासगी संस्थेला सदर भूखंड वापरण्यास व शाळा बांधण्यास प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, समाविष्ट गावांतील २० वर्षांचा विकासाचा अनुशेष भरुन काढण्याच्या दृष्टीने सदर भूखंड खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला माझा तीव्र विरोध आहे. सदर कार्यवाही तात्काळ रद्द करावी, अशी आग्रही मागणी केली. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार सदर निविदा प्रक्रिया रद्द केली आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

समाविष्ट गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात विकासाला चालना देण्यात आली. त्यामुळे ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित झाला आहे. लोकसंख्या आणि गृहप्रकल्प वाढले आहेत. स्थानिक खेळाडुंना प्रोत्साहन मिळावे आणि हक्काचे व्यासपीठ तयार व्हावे. या करिता महापालिका प्रशासनाने चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक २/९२ याठिकाणी क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) सुरू करावे, अपेक्षा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CM Shinde | आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

Prakash Ambedkar | ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळेच असले पाहिजे, आंबेडकरांनी स्पष्ट केली वंचितची भूमिका

Nana Patole | आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही

Previous Post
Pooja Khedkar | "सगळ्यांना तुरुंगात टाकेन", ऑडी कारवर कारवाई करायला गेलेल्या पुणे पोलिसांना IAS पूजा खेडकरच्या आईची दमदाटी

Pooja Khedkar | “सगळ्यांना तुरुंगात टाकेन”, ऑडी कारवर कारवाई करायला गेलेल्या पुणे पोलिसांना IAS पूजा खेडकरच्या आईची दमदाटी

Next Post
Hardik Pandya | नताशासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कोणत्या मुलीसोबत दिसला हार्दिक पांड्या, फोटो होतोय व्हायरल

Hardik Pandya | नताशासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कोणत्या मुलीसोबत दिसला हार्दिक पांड्या, फोटो होतोय व्हायरल

Related Posts

त्या निकालाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील – नवाब मलिक

मुंबई – राज्यातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या सर्व…
Read More
केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी उद्या गदर 2 सिनेमाचा खास शो

केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी उद्या गदर 2 सिनेमाचा खास शो

मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यासाठी  उदया दि.2…
Read More
Krishna Temple | वृंदावनाचे ते कृष्ण मंदिर, जिथे वर्षातून दोनदाच दरवाजा उघडतो

Krishna Temple | वृंदावनाचे ते कृष्ण मंदिर, जिथे वर्षातून दोनदाच दरवाजा उघडतो

Krishna Temple : भारतातील अशी अनेक रहस्ये आहेत जी आजपर्यंत माहित नाहीत. येथे अशी अनेक मंदिरे आहेत, जी…
Read More