राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामाचा कार अपघातात मृत्यू

 Manikrao Raizade : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव रायजादे (Senior Congress leader Manikrao Raizade) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. धुळे- सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात माणिकराव रायजादे यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे माणिकराव रायजादे हे त्यांच्या दिवंगत बहीण व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांच्या धार्मिक विधीसाठी दर महिन्याला बीडला येतात. दरम्यान हे धार्मिक विधी आटोपल्यानंतर ते आपला मुलगा प्रतीमसह नाशिकला परत निघाले होते. तर यावेळी प्रीतम गाडी चालवत होता आणि माणिकराव रायजादे बाजूच्या सीटवर बसले होते.

दरम्यान अचानक गाडी डिव्हायडरला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात माणिकराव रायजादे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा प्रीतम रायजादे हा जखमी झाला आहे.  प्रीतम रायजादे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.