बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करणारे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी धस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार, धस यांच्या आशीर्वादानेच सतीश भोसले उर्फ खोक्या बेकायदेशीर कामं करत होता, ज्यात हरण, काळवीट आणि मोर तस्करीचा समावेश आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस (Suresh Dhas) यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्या नार्को टेस्टचा आदेश द्यावा, जेणेकरून सत्य समोर येईल,” अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. “खोक्याने आपले कारनामे बाहेर काढू नयेत म्हणून सुरेश धस यांनी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली,” असा आरोप करत वाघमारे यांनी एसआयटी चौकशीचीही मागणी केली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
देवेंद्र फडणवीस आणि बिल गेट्स यांची मुंबईत बैठक; ‘या’ विषयांवर झाली चर्चा