Amol Mitkari | मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी, अजित पवार विरुद्ध राज ठाकरे संघर्षाची सुरुवात!

Amol Mitkari | मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची गाडी, अजित पवार विरुद्ध राज ठाकरे संघर्षाची सुरुवात!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सुपारीबाज अशी टीका करणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना चांगलेच महागात पडले आहे. अमोल मिटकरींविरोधात मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी अकोल्यात त्यांच्यावर हल्ला केला. मनसेच्या कार्यकर्त्यांचा अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करतानाचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

अजित पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर देताना काल अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) राज ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख केला. याचा राग मनात धरुन अकोल्यातील विश्रामगृहाबाहेर अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अमोल मिटकरी आज अकोल्यात विश्रामगृहात आले होते. ते आतमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. ते आले तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसेचे कार्यकर्तेदेखील होते. अमोल मिटकरी विश्रामगृहात असताना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या कारच्या काचा फोडल्या आणि प्रचंड घोषणाबाजी केली.

मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. गाडीच्या तोडफोड प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. माझं वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Prakash Ambedkar | ‘मनोज जरांगे विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी राज्यात एक नौटंकी सुरू आहे’

Sharad Pawar | महाराष्ट्रात मणीपुरसारखी स्थिती स्थिती निर्माण व्हायला नको, शरद पवारांनी व्यक्त केली भीती

Ajit Pawar | मास्क, टोपी घालून दिल्लीला जायचो; अजित पवारांनी सांगितली महायुतीत जातानाची इनसाइड स्टोरी

Previous Post
Raj Thackeray | शि. द. फडणीस यांनी काढून ठेवलेली व्यंगचित्र सोपी नाहीत

Raj Thackeray | शि. द. फडणीस यांनी काढून ठेवलेली व्यंगचित्र सोपी नाहीत

Next Post
Manu Bhakar | मनू भाकरने इतिहास रचला, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली

Manu Bhakar | मनू भाकरने इतिहास रचला, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली

Related Posts
Uddhav Thackeray

विकास कशाला म्हणावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे

मुंबई – वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे…
Read More
Nupur Sharma

‘… तर लवकरच भाजप नुपूर शर्मा यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बनवू शकते’

नवी दिल्ली – AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला (Central Government)…
Read More
गिरीश महाजन

मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा; गिरीश महाजन यांचे खेळाडूंना आवाहन 

पुणे  –राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून…
Read More