पुण्यातल्या पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिदी; मनसेचा दावा

Pune – देशात सध्या ज्ञानव्यापी मशीदीचा (Gyanvapi Mosque) मुद्दा चांगलाच पेटला असताना आता पुण्यातही पुण्येश्‍वर (Punyeshwar) आणि नारायणेश्‍वर ( narayaneshwar) मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. या मंदिराच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारले आहेत. ज्ञान व्यापी प्रमाणे लवकरच या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटलं आहे.

अजय शिंदे यांनी म्हटलं की, पुण्येश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा (Allauddin Khilji) एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर (Temple of Lord Shiva) उध्वस्त केलं. एक मंदिर नाही तर दोन मंदिरं उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर (Punyeshwar and Narayaneshwar)  ही मंदिरं उध्वस्त केली.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोन्ही मंदिरं कुठं आहेत. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांच्या वर मशिदी निर्माण झाल्या आहेत, असा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.