वर्षानुवर्षे मराठी फलक लावून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचा मनसेने केला सत्कार

औरंगाबाद – कायदा तर आज होतोय, पण आमचे अनेक व्यावसायिक बंधू वर्षानुवर्षे मराठी फलक लावून व्यवसाय करत आहेत. सरकारची अस्मिता आज जागी झाली असेल, पण या माणसांनी मराठी अस्मिता कधीपासूनच जोपासली आहे. अशी जोपासना करणाऱ्या आमच्या मराठी व्यावसायिक बांधवांचे मनसे तर्फे गौरव पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.

काल मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनां मध्ये मराठी भाषेत ठळक अक्षरांत नामफलक लावणे सक्तीचे करण्यात आले खरंतर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विजय आहे,मनसे तर्फे सातत्याने मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले गेले,अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल झालेत तरीही मराठीला न्याय मिळाला ह्याचा जास्त आनंद कार्यकर्त्यांना आहे असं मनसेचे नेते सुमित खांबेकर यांनी म्हटलं आहे.

संभाजीनगर मध्ये अनेक दुकाना असे आहेत की ज्यांच्या दुकानाच्या पाट्यां बऱ्याच वर्षांपासून फक्त मराठीत आहेत,ह्या सर्व दुकांनदाराचा सत्कार मनसे तर्फे करण्यात आला, शहरातील पिरबाजार ही मुख्य बाजारपेठ आहे येथील व्यापाऱ्यांचा शाल,हार आणि गौरव पत्र देऊन सत्कार करण्यात आला,या वेळी एकूण 64 दुकांनदाराचे अभिनंदन-सत्कार करण्यात आले.