हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी आणि रासनेंच्या विजयासाठी मनसे शेवटच्या क्षणी मैदानात

Pune bypoll election :  पुण्यातील पोटनिवडणुकीच्या  (Pune Bypoll Election) पार्श्वभूमीवर रोज नव्या घडामोडी समोर येत आहे. नेत्यांच्या भाषणाच्या तोफा थंडावल्या आहेत. आता उमेदवारांकडून छुपा प्रचार सुरू झाला आहे. सर्सार्यातच आता हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत पूर्ण क्षमतेने उतरण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी रात्री दिले.

दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत… काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. उद्या या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २ मार्चला याचा निकाल लागणार आहे. मतदानाला एकच दिवस शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांसोबतच सर्वपक्षीय नेते आज मतदारांच्या थेट भेटी घेण्यावर भर देताना दिसून येत आहेत. आजही सर्वच पक्षाचे महत्वाचे नेते शहरात तळ ठोकून आहेत.