हिंदुत्व आणि विकासाठी मनसे भाजप सोबत; रवींद्र चव्हाण यांनी घेतली पुण्यातील मनसे नेत्यांची भेट

Pune – हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. म्हणूनच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घेतला असल्याचे मत प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी व्यक्त केले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्या. तेव्हा मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप सोबत असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. चव्हाण यांनी मनसे नेते दीपक पायगुडे, बाळा शेडगे, सुशिलाताई नेटके, अजय शिंदे, प्रल्हाद गवळी (MNS leaders Deepak Paigude, Bala Shedge, Sushilatai Netke, Ajay Shinde, Prahlad Gawli) यांच्या सह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

चव्हाण म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. मनसेचे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजसाहेब दोन दिवसात पुण्यात येणार आहे, त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनाप्रमाणे काम अधिक गती घेईल. त्यामुळे कसबा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना मोठे बळ मिळाले असून विक्रमी मताधिक्याने विजय होईल असा विश्वास वाटतो.