Amol Mitkari | महाराष्ट्रात सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात संघर्ष सुरू आहे. राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी काल अमोल मिटकरींची गाडी फोडली. त्यानंतर काही तासांतच मिटकरींची गाडी फोडणारा मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.
अमोल मिटकरींची (Amol Mitkari ) गाडी फोडल्यानंतर काही वेळाने जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण थोड्या वेळाने त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यामुळे हे प्रकरण आणखीन तापले आहे.
असे असतानाच तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे. पंकज साबळे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. दोघांनाही अटकेनंतर अस्वस्थ वाटत असल्यानं उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अद्याप फरारच अहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप