मोबाईलची बॅटरी लवकर संपतेय? ‘हे’ उपाय करून पाहा

पुणे : आज-काल मोबाईल कंपनी जास्त काळ टिकणाऱ्या मोबाईलच्या बॅटरीचे वचन देताना दिसत आहेत पण गेल्या काही दिवसांपासून मोबाईलची बॅटरी लवकर संपत असल्याची ओरड देखील ग्राहकांमधून येत आहे. सध्याच्या काळात आपल्या दिनचर्येचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपला मोबाईल. जर त्या मोबाईलला चार्जिंग नसेल आणि तो बंद पडला तर आपली अनेक कामे अडकून पडतात. आज आपण या लेखाच्या माध्यमातून मोबाईलची बॅटरी जास्त वेळ कशी टिकेल यासाठीच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

सध्याच्या नव्या मोबाईलमध्ये आता लीथीयम आयन बॅटरीचा वापर केल्यानं आधीच्या तुलनेत ती जास्त टिकून राहण्यास मदत होते. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांचं लाईफ आणखी वाढून उत्तम परफॉर्मेंस देऊ शकते.तुमचा स्मार्टफोन अशा ठिकाणी ठेवा जिथे तापमान कमी असेल. अति तापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो.

तुमचा फोन टीव्ही किंवा फ्रीजवर ठेवू नका ज्यामुळे त्याच्या बॅटरीवरही परिणाम होतो. उन्हामध्ये फोन गरम होतो अशावेळी बाहेर असाल आणि फोन जास्त गरम झाला असेल तर फोन काहीवेळ आवश्यकता नसल्यास बंद ठेवा त्यामुळे बॅटरी नॉर्मवर येण्यास मदत होते.

तुमचा मोबाईल चार्ज करताना त्याच कंपनीचा आणि ओरिजनल चार्जरचा वापर करा. दुसऱ्या कंपनीचे चार्जर किंवा डुप्लिकेट चार्जरमुळे फोनच्या बॅटरीला हानी पोहोचू शकते. काहीवेळा सुपरफास्ट चार्जिंग करणाऱ्या कॉर्ड आणि अॅडप्टर बाजारात उपलब्ध असतात मात्र त्यांचा वापर टाळावा. लीथियम आयन बॅटरी जेवढी हळूहळू चार्ज होईल तेवढा चांगला रिझर्ट मिळेल.

याशिवाय GPS म्हणजेच तुमच्या मोबाईलचं लोकेशन जर सुरु असेल तर यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. यूजर्सनी उपयोगानंतर ताबडतोब जीपीएस बंद करावा. तसंच ब्ल्यूटूथ जीपीएसनंतर सर्वाधिक बॅटरी वापरतो त्यामुळे जेव्हा गरजअसेल तेव्हाच त्याचा वापर करा. आपल्या मोबाईलची जास्तीत जास्त बॅटरी या ब्राईटनेस मध्येच जाते त्यामुळे उपलब्ध असलेल्या प्रकाशानुसार तुम्हाला हवा तेवढाच मोबाईलचा ब्राईटनेस ठेवावा यातून तुमची बॅटरी तर सेव्ह होईलच आणि तुमच्या डोळ्यांना त्रास सुद्धा होणार नाही. सध्याच्या बहुतेक सगळ्या मोबाईलला ऑटोब्राईटनेसची सोय आहे ती जर तुम्ही ऑन केलात तर उत्तमच.

बर्‍याचदा एक अप्लिकेशन उघडल्यानंतर आपण ती बंद न करता अनेक अप्लिकेशन ओपन करतो. मात्र आपणास माहिती आहे का की आधी ओपन केलेले अप्लिकेशन बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनची बॅटरी लवकरच संपेल. हे टाळण्यासाठी यूजर्सनी सर्व बॅकग्राउंड अ‍ॅप्स मधूनमधून बंद केले पाहिजेत.