25 वर्षीय चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; मोबाईल चोरी करून अंडरवेअरमध्ये लपवायचा फोन

पुणे – पुण्यातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुण्यातून एका मोबाइल चोराला अटक केली आहे. आरोपी हा मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी असून त्याच्या टोळी महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

नागेश आप्पाना असं अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय मोबाइल चोरट्याचं नाव आहे, पोलिसांनी आरोपीकडून 38 महागडे मोबाइल फोन आणि ईर्टीगा कार जप्त केली आहे. आरोपी आपल्या टोळीसह हैदराबादहून पुण्यात कारने येत असत. पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत आरोपी प्रवाशांचे मोाबाइल गायब करत होते.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपींचा हा उद्योग सुरू होता. संबंधित मोबाइल चोरटे पीएमपीएल बसमधील प्रवाशांचे मोबाइल चोरण्यासाठी खास अंडरवेअरचा वापर करत होते. गर्दीत प्रवाशाचा मोबाइल चोरल्यानंतर तो मोबाइल चोरटे आपल्या अंडरवेअरमध्ये लपवत असायचे. त्यामुळे त्यांची झडती घेतली तरी मोबाइल हाती लागत नव्हते. यापूर्वी आरोपीवर पुण्यातील भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे  दाखल आहे, या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलीस करताहेत.