जनतेकडून पैसे लुटून मोदी सरकार आपले ‘ग्राफ’ नीट करायच्या मागे

अमरावती : देशातील वाढत्या महागाई (Inflation)वर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Minister for Women and Child Development Adv. Yashomati Thakur) प्रतिक्रिया व्यक्त करीत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा 9Targeting Modi government) साधला आहे. त्यांनी “सामान्य माणूस गॅसवर! पन्नास रूपयांची वाढ ही काही सामान्य वाढ नव्हे. मोदी सरकार जनतेकडून पैसे लुटून आपले ‘ग्राफ’ नीट करायच्या मागे लागले आहे” अशा आशयाचे सूचक ट्विट करीत सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

देशात पेट्रोल डिझेलसह अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. आधीच लॉकडाउननंतर सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना, आता केंद्रातील सरकारने महागाईचा आणखी एक धक्का दिल्याने सामान्य माणूस गॅसवर गेला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रुपयांच्या वाढीसह 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरचे  (cylinder) दर आता ९९९.५० रुपयांवर पोहोचले आहेत. इथून पुढे एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडर  महागल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट (Financial budget) कोलमडणार आहे.