modi government | लोकसभा निवडणुकीत भाजपाने जेडीयू आणि टीडीपीला एकत्र घेत एनडीए सरकारची स्थापना केली होती. त्यामुळे मोदी सरकारच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात नितीश कुमार यांच्या बिहार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
बिहारसाठी खास योजना
बिहारमध्ये औद्योगिक विकास करण्यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे पूर्वेकडील राज्यात विकासाला गती मिळेल. बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर देण्यात येणार आहे. पाटणा-पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर-भागलपूर राजमार्ग, बुद्धगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्यासाठी 26 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे, अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये केली.
10 वर्षांत पहिल्यांदाच आंध्र प्रदेशवर विशेष लक्ष
आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने (modi government) बजेटमध्ये 15 हजार कोटींची तरतूद केली आहे. अमरावतीला आधुनिक आणि विकसित शहर बनवण्यासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पाला प्राधान्य दिलं आहे. 10 वर्षात पहिल्यांदाच आंध्र प्रदेश या राज्याला महत्त्वाचं स्थान मिळालं आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Amit Shah | औरंगजेब फॅन्स क्लबचे उबाठा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका