Prakash Ambedkar | मतदारांना गृहीत कधी धरता येत नाही. निवडणूका जाहीर होईपर्यंत लोक शांत होती आपले मत सांगायला तयार नव्हती. निवडणूका जाहीर झाल्या आणि मतदार बोलायला लागला की, गेल्या दहा वर्षांत मोदीने (Narendra Modi) स्वतःचे व्यक्ती महत्व वाढवलं पण लोकांचे वाटोळं केले, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली.
स्वतःच्या व्यक्ती महत्त्वा पुढे त्याने काही पाहिले नाही, म्हणून ज्याने लोकांना हवेत सोडलं. आता लोक त्यालाच हवेत सोडायला निघालेत अशी परिस्थिती असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते दक्षिण मध्य मुंबई मतदासंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, अबुल हसन खान यांच्या मतपेटीत आज सव्वा दोन लाख मतं बंद आहेत. जिंकायला त्यांना दीड लाख मतांची गरज आहे. ज्यांनी मुस्लिमांच्या विरोधात भूमिका घेतली. उध्दव ठाकरे भाजप आणि मोदी सोबत जाणार नाहीत असे लिहून द्यायला तयार नाहीत त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का ? असा सवाल आपण मुस्लीम बांधवांना केला पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीचे मुंबई दक्षिण मध्य उमेदवार अबुल हसन खान यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची सत्ता संपादन जाहीर सभेत प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :