मोदींचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, अजितदादा म्हणतात…

मोदींचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, अजितदादा म्हणतात...

मुंबई : बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाई नगर परिषद अनेक वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. आज नव्याने पक्षप्रवेश झालेले पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणी देखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होऊ न देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्षावाढीसाठी काम करू, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=HZiVl7Ir5qw

Previous Post
Nana Patole And Sameer Wankhede

मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ – नाना पटोले

Next Post
दारूबंदीसाठी 3 महिन्यापासून महिला झिजवत आहेत शासकीय कार्यालयांचे उंबरठे

दारूबंदीसाठी 3 महिन्यापासून महिला झिजवत आहेत शासकीय कार्यालयांचे उंबरठे

Related Posts

बँकेत लॉकर कसा मिळतो? किती चार्ज लागतो आणि काय नियम असतात? जाणून घ्या सर्वकाही

तुम्ही लॉकर भाड्याने घेण्याची योजना करत आहात? किंवा आधीच बँक लॉकर वापरत आहात? जर होय, तर या बातमीत…
Read More

लग्नाची अंगठी फक्त चौथ्या बोटातच का घातली जाते? याचा खरंच काही हृदयाशी संबंध आहे का?

जेव्हा जेव्हा लग्नाची अंगठी (Wedding Ring) घातली जाते, तेव्हा ती डाव्या हाताच्या चौथ्या बोटात घातली जाते. लग्नाची अंगठी…
Read More
अदानीच्या प्रकल्पासाठी संपूर्ण प्रशासन दावणीला, सरकारची मनमानी खपवून घेणार नाही | Sachin Sawant

अदानीच्या प्रकल्पासाठी संपूर्ण प्रशासन दावणीला, सरकारची मनमानी खपवून घेणार नाही | Sachin Sawant

Sachin Sawant | मुंबई सारख्या राज्याच्या राजधानीत व देशाच्या राजधानीत खुलेआम बिल्डरच्या मर्जीने एसआरए जनतेवर अत्याचार करत आहे.…
Read More