Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Modi’s Cabinet : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदी नियुक्त नरेंद्र मोदींना (Narendra Modi) नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं असून केंद्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होणार आहे. आज संध्याकाळी सव्वा सात वाजता हा सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रपती, मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. शुक्रवारी, नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला.

महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेत. भाजपचे नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. तर रामदास आठवलेंना पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. तर शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय. यावेळी प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागलीय.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएच्या शिष्टमंडळानंही राष्ट्रपतींची भेट घेतली होती आणि नरेंद्र मोदी यांची भाजपाच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाल्याचं पत्र तसंच एनडीएच्या घटक पक्षांच्या पाठिंब्याची पत्रंही राष्ट्रपतींना सादर करण्यात आली होती. आजच्या या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशांतील अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं असून श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Naseem Khan : महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्या – नसीम खान

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली इच्छा

“अयोध्येतील भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे…”, भाजपच्या पराभवावर ‘शक्तिमान’ची लक्षवेधी प्रतिक्रिया

You May Also Like