इंधनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर मोदींचे ट्वीट, म्हणाले….

नवी दिल्ली – इंधनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्क (Central excise duty) कमी करत असल्याची घोषणा काल वित्तमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केली. यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर साडे नऊ रुपयांची घट होणार असून डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. राज्यांनीही करसवलत लागू करून सामान्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश सीतारामन यांनी दिले आहेत.

या वर्षी सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना 12 सिलिंडरपर्यंत प्रति गॅस सिलिंडर 200 रुपये अनुदान देईल अशी घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान,  या निर्णयानंतर पीएम मोदींनी (P.M. Modi)  ट्विट केले, आमच्यासाठी लोक नेहमीच प्रथम असतात ! आजचे निर्णय, विशेषत: पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel)  किमतीतील लक्षणीय घट संबंधित, विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करतील, आमच्या लोकांना दिलासा देईल. असं मोदींनी म्हटले आहे.