रोहित पवार मोहित कंबोज यांच्या रडारवर, ट्वीट करून दिला इशारा, बारामतीत खळबळ

Mumbai – राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असं ट्वीट करून भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj Bharatiya) यांनी खळबळ उडवून दिली होती. आता मोहित कंबोज यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे वळवला आहे. रोहित पवार (rohit pawar) यांच्याबद्दल अभ्यास करत असल्याचा इशाराच कंबोज यांनी दिला.

मोहित कंबोज यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याबद्दल भाकीत वर्तवलं होतं. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी आमदार रोहित पवार यांच्या बाबतीत सूचक ट्विट केलं आहे.“बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा मी सखोल अभ्यास करतोय. त्या संदर्भातील अधिकचे अपडेट लवकरच देईल”, असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे. त्यामुळे कंबोज यांनी काही दिवसांआधी इशारा केलेला ‘राष्ट्रवादीचा बडा नेता’ रोहित पवार आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय.