आईचे नाव- प्रियांका चोप्रा, वडिलांचे नाव- सनी देओल; अशी उत्तरे विद्यार्थ्याने परीक्षेत दिली

दिल्ली : सोशल मीडियावर अशी अनेक फोटो आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या नावासमोर बॉलिवूड सिनेतारकांची नावे लावतात. इतकेच नाही तर अनेकवेळा बॉलीवूड सिनेतारकांचे फोटो परीक्षेच्या अडमिट कार्डमध्ये दिसला आहे. अनेक वेळा अशा घटना खऱ्या असल्या तरी काही खोडकर व्यक्ती अशा गोष्टी इंटरनेटवर व्हायरल करण्यासाठी पोस्ट करतात. असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याने आपल्या पालकांच्या नावावर बॉलिवूड सिनेतारकांची नावे लिहिल्याचे दिसून येते.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये बिहारच्या बेतिया येथील राम लखन सिंह यादव कॉलेजच्या उत्तरपत्रिकेत एका विद्यार्थ्याने आपल्या आईचे नाव प्रियांका चोप्रा आणि वडिलांचे नाव सनी देवल असे लिहिले आहे. यामध्ये विद्यार्थ्याने शिवशंकर कुमार असे आपले नाव लिहिले आहे. इतिहासाच्या परीक्षेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहून तुमचे हसू आवरता येणार नाही. इतिहासाच्या परीक्षेत विचारला जाणारा पहिला प्रश्न होता- तुम्हाला पुरातत्वशास्त्र काय समजते? त्याला उत्तर देताना विद्यार्थ्याने लिहिले, ‘माझ्या गुरुने मला शिकवले नाही. आम्हाला पुरातत्वशास्त्रातील काहीही समजत नाही.

दुसरा प्रश्न- मोहेंजोदारोच्या विशाल स्नानगृहाचे वर्णन करा. यावर विद्यार्थ्याने उत्तरात लिहिले की, ‘राजाची पत्नी मोहेंजोदारोच्या विशाल स्नानगृहात अंघोळ करायची आणि कपडे काढायची.’ शेवटचा प्रश्न- अकबराने जिझिया कर का रद्द केला? यावर विद्यार्थिनीने उत्तरात लिहिले की, ‘अकबरच्या मैत्रिणीचे नाव रझिया होते. अकबराचे रझियावर खूप प्रेम होते. त्यामुळे रझियाच्या सांगण्यावरून जिझिया कर काढून घेण्यात आला. हे वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल.