राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दलाल नेते रस्त्यावर फिरताना दिसले, तर त्यांच्या अंगावर थुंका – जलील 

संभाजीनगर –  शिवसेनेची हिंदुत्वावरून कोंडी करण्यासाठी पुढे केला जाणारा औरंगाबाद (Aurangabad) व उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांचा नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. नामांतरामुळे कायदा व सुव्यवस्थेची (law and order) स्थिती निर्माण होऊ नये म्हणून औरंगाबाद शहरातील चौकाचौकात बुधवारी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

खडकी, फतेहनगर,औरंगाबाद व संभाजीनगर असे नामांतराचे टप्पे शहराने अनुभवले आहेत. दरम्यान नामांतर करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी व्यक्त केली होती.  विभागीय आयुक्तांनी दोन शहराची नावे बदलण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

दरम्यान, या निर्णयावरुन एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (AIMIM MP Imtiaz Jalil) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली.हा निर्णय अतिशय घाणेरड्या राजकारणासाठी घेण्यात आला आहे. आता शहरातील राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्यांच्या फोटोवर चपलांचा हार घातला पाहिजे. राजकारणासाठी हे नेते अतिशय खालच्या पातळीवर आले. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दलाल नेते रस्त्यावर फिरताना दिसले, तर त्यांच्या अंगावर थुंका. यांनी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण केले. सत्तेचा इतकाच मोह होता, तर सत्तेला चिटकून बसायला हवं होतं. आम्ही चपला मारू अशा नेत्यांना, अशी घणाघाती टीका जलील यांनी केली.