Praniti Shinde | खासदार प्रणिती शिंदेंच्या डोक्यात गेली हवा; चंद्रकांत पाटलांचा ‘चंपा’ म्हणून उल्लेख

सोलापूर | सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा ‘चंपा’ म्हणून उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे शिंदे यांच्या डोक्यात खासदारकीची हवा गेली आहे का अशी चर्चा आता यामुळे व्हायला लागली आहे.

सोलापूरमधील एका ठिकाणी कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्या. याचं कारण देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागते. मला इथे यायला उशीर झाला. 10 वाजताची वेळ होती, पण मला यायला दोन वाजले. कारण मी इथंपर्यंत आले होते, पण आपले पालकमंत्री चंपा असं प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एका बाजूला महाराष्ट्राला सुसंकृत राजकारणाची मोठी परंपरा असताना शिंदे यांच्या या कृतीमुळे या परंपरेला छेद दिला जात असल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले. आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like